लक्ष्मीपूजन व दिवाळीच्या पावन पर्वावर तुमसर तालुक्यात काही ठिकाणी लक्ष्मी मातेच्या मूर्तीची स्थापना करण्याची परंपरा आहे. याच परंपरेला जपून आज दि. 21ऑक्टोबर रोज मंगळवारला रात्री 8 वाजता चुल्हाड येथे बाल लक्ष्मी उत्सव मंडळ व जय मा आदर्श लक्ष्मी उत्सव मंडळ तर्फे लक्ष्मी मातेच्या मूर्तीचे हे डीजेच्या तालात नाचत गाजत मोठ्या भक्ती भावात करण्यात आले .दरम्यान, गावातील पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते लक्ष्मी मातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.