जालना: जालन्यात अवैध वाळू उत्खननाविरोधात प्रशासनाचा दणका; जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची मध्यरात्री अचानक पाहणी..
Jalna, Jalna | Jun 12, 2026 जालन्यात अवैध वाळू उत्खननाविरोधात प्रशासनाचा दणका; जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची मध्यरात्री अचानक पाहणी.. आज दिनांक 12 शुक्रवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात गौण खनिजाच्या अवैध उत्खनन, वाहतूक आणि साठवणुकीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल आणि पोलीस अधीक्षक श्री. तेगबीर सिंग संधू यांनी गुरुवारी मध्यरात्री अंबड तालुक्यातील गोंदी परिसरात अचानक भेट देत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणी