भद्रावती: ग्रामोदय संघाच्या अध्यक्षपदी विजय श्रीवास्तव तर सचीवपदी अयुब हुसेन यांची निवड.
देशातील पहिला सिरैमीक प्रकल्प असलेल्या शहरातील ग्रामोदय संघाच्या अध्यक्षपदी विजय श्रीवास्तव यांची तर सचीवपदी अयुब हुसेन यांची पुढील पाच वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे. नवी कार्यकारणी ग्रामोदय संघाला सतत प्रगतीपथावर नेईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. नव्या कार्यकारणीचे शहरात सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.