खामगाव: जनुना तलाव उजळला स्वच्छतेच्या दिव्यांनी!”
नव संकल्प फाउंडेशनचा पर्यावरणपूरक दिवाळी उपक्रम
दिवाळीचा उत्सव फक्त दिव्यांच्या प्रकाशात नव्हे, तर स्वच्छतेच्या उजेडात साजरा करण्याचा संदेश देत नव संकल्प फाउंडेशन च्या व तिने आज दिनांक २१ ऑक्टोंबर रोजी सकाळी ७ वाजे पासून जनुना तलाव येथे भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. “या दिवाळीत फक्त घर नाही, तर मन आणि निसर्गही उजळू दे” असे घोषवाक्य घेत नव संकल्प फाउंडेशनच्या सदस्यांनी जनुना तलावाच्या किनाऱ्या जवळच्या झाडे व स्वच्छता केली. या मोहिमेच्या माध्यमातून खामगावकरांनी पर्यावरणपूरक दिवाळीचा नवा आदर्श दिला आहे.