पाटोदा: पंकजा मुंडेंनी मेळाव्याची परंपरा मोडू दिली नाही ही अभिमानास्पद बाब, आमदार धनंजय मुंडे यांनी मेळाव्यातून व्यक्त केले
Patoda, Beed | Oct 2, 2025 धनंजय मुंडे म्हणाले, "पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला उपस्थित सर्वांसमोर मी नतमस्तक होतो. काही दिवसांपूर्वी मराठवाड्यातील पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे हा मेळावा होईल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पंकजा मुंडेंनी परंपरा मोडू दिली नाही, ही बाब अभिमानास्पद आहे. मला माझ्या बहिणींचा अभिमान आहे. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर अनेक अडचणी आल्या, तरी त्यांनी ही परंपरा सुरू ठेवली." ते पुढे म्हणाले, "आम्ही लहान असताना या दसरा मेळाव्याला येत असू.