जालना: मोतीबाग येथील गरुड प्रतिमेवर डान्स करून व्हिडिओ व्हायरल करणारा युवक अटकेत; अनेक दिवसापासून पोलीस होते मागावर
Jalna, Jalna | May 29, 2026 जालना शहरातील मोतीबाग चौपाटी परिसरातील नव्याने उभारण्यात आलेल्या गरुड प्रतिमेवर चढून डान्स करत व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित करणार्या युवकाला चंदनझिरा पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवार दि. 29 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार दिनेश कैलास गायकवाड रा. मंगळ बाजार, जालना असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे. त्याने काही दिवसांपूर्वी मोतीबाग चौपाटी येथील गरुडाच्या प्रतिमेवर चढून डान्स केला होता. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.