लग्न समारंभात पाहुणे किंवा भिकारी बनून दागिने चोरणे, तसेच अंगावर टोमॅटो सॉस टाकून नागरिकांचे लक्ष विचलित करत पाकीटमारी करणे, अशा आंतरराज्यीय गुन्ह्यांची 'मोडस ऑपरेंडी' (गुन्हा करण्याची पद्धत) असलेल्या टोळीला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने पाठलाग करून अटक केली आहे. मध्यप्रदेशातील या टोळीने बीड, अंबाजोगाई आणि गेवराई परिसरात धुमाकूळ घातला होता बादल कृष्णा सिसोदिया (वय २४), काला उर्फ ऋतिक महेश सिसोदिया (वय २९), दीपक दिलीप सिसोदिया (वय २९) आणि जस्वंत मनिलाल सिसोदिया (वय २७) (सर्व रा. गुलख