हातकणंगले: जुन्या वादातून भर दिवसा कोयत्याने प्राणघातक हल्ल्याने कबनूर गावात खळबळ, हल्ल्यात पती-पत्नी गंभीर जखमी
इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर गावात आज शनिवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास जुन्या वादातून पती-पत्नीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला.या हल्ल्यात प्रमोद शिंगे आणि त्यांची पत्नी अश्विनी शिंगे हे दोघे गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.प्राप्त माहितीनुसार,प्रमोद शिंगे व अश्विनी शिंगे हे दांपत्य आपल्या चारचाकी वाहनातून काही कामानिमित्त जात असताना ग्रामपंचायत कार्यालयाजवळ चार ते पाच हल्लेखोरांनी धारदार कोयत्यांनी हल्ला केला.