नागपूर ग्रामीण: कोराडीत गॅससाठी नागरिकांची वणवण; भरउन्हात रांगा लावूनही एजन्सीकडून टोलवाटोलवी
विदर्भातील ४२ अंश सेल्सिअस तापमानात कोराडी कॉलनी परिसरातील नागरिक गॅस सिलिंडरसाठी हवालदिल झाले आहेत. स्थानिक गॅस एजन्सीच्या नियोजित अनागोंदीमुळे नागरिकांना भरउन्हात तासनतास रस्त्यावर उभे राहावे लागत आहे.कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असताना, वृद्ध आणि महिलांना तासनतास गॅसच्या गाडीची वाट पाहावी लागत आहे.गाडी कधी येणार? या प्रश्नावर कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे.