श्रीवर्धन: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राथमिक,पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्यास उद्याचे उच्च शिक्षित नागरिक घडतील
खा. तटकरे
श्रीवर्धन नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक २ व ३ च्या पुनर्निर्माणासाठी भूमिपूजन खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते पार पडला. श्रीवर्धन नगरपरिषदच्या शाळांच्या कामासाठी महानगर गॅस लिमिटेड व आर.सी.एफ. यांच्या सी.एस.आर. फंडातून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. भूमिपूजनामुळे नगरपरिषद शाळांच्या पुनर्निर्माणाचा मार्ग मोकळा झाला असून, विद्यार्थ्यांना लवकरच उत्तम सोयीसुविधा असलेली शैक्षणिक इमारत उपलब्ध होणार आहे.