शहरात सध्या सिमेंट रोडचे जाळे पसरत असताना, अनेक जुन्या घरांची पातळी रस्त्यापेक्षा खाली गेल्याने नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र, नागपूरच्या न्यू ज्ञानेश्वर नगर भागात तंत्रज्ञानाच्या जोडीने एक थक्क करणारा प्रयोग यशस्वी करण्यात आला आहे. रस्त्याखाली दबलेले एक संपूर्ण घर तब्बल २५० जॅकच्या साहाय्याने ५ ते ६ फूट वर उचलण्यात आले आहे.