खटाव: कत्तलखान्याकडे जनावरे नेणारा ट्रक वडूज पोलिसांनी मायणी येथे पकडला; सात लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक
Khatav, Satara | Sep 16, 2025 वडूज पोलीस ठाण्याच्या अंकित असलेल्या मायणी पोलीस दुरक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी रात्री साडेअकरा वाजता बेकायदेशीररित्या जनावरे वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून सात लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी मंगळवारी दुपारी एक वाजता याबाबतची माहिती पत्रकारांना दिली. मायणी दूरक्षेत्राच्या हद्दीमध्ये रात्रगस्तीवर असलेल्या पोलीस अंमलदारांना एका ट्रकवर संशय आल्याने त्यांनी ट्रक थांबवला.