नागपूर शहर: वैशाली नगर येथे शुल्लक कारणावरून झालेल्या वादाने घेतले हिंसक रूप,चाय विक्रेत्यावर लाकडी दांड्याने जीवघेणा हल्ला
वायरल होत असलेले सीसीटीव्ही फुटेज हाती आले आहे.वैशाली नगर परिसरात शुल्लक कारणावरून झालेल्या वादाने हिंसक रूप धारण केले असून, येथील एका चहा विक्रेत्याला लाकडी दांड्याने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अभिरूप आशिष कुमार समंदर यांचे वैशाली नगर परिसरात चहाचे दुकान आहे. त्यांच्या दुकानासमोरच प्रणय लारोकर यांचेही चहाचे दुकान आहे.