दिग्रस: नगर परिषद निवडणुकीसाठी आजपर्यंत तीन अपक्ष उमेदवारांचे अर्ज, दुसऱ्या दिवशी एक नामांकन अर्ज सादर
दिग्रस नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत एकूण तीन अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये दोन अर्ज नगरसेवक पदासाठी तर एक अर्ज नगराध्यक्ष पदासाठी दाखल झाला आहे. आज दि. ११ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत दुसऱ्या दिवशी, प्रभाग क्र. १० ब मधून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून इशरत परवीन एजाज खान यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांचे पती एजाज खान नवाज खान यांनी याआधी प्रभाग क्र. १२ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.