राळेगाव: शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू वरुड जहागीर येथील घटना
राळेगाव तालुक्यातील वरुड जहागीर येथे दिनांक 2 नोव्हेंबर रोजी शेतकरी दिलीप शामराव ठाकरे वय 45 हे शेतात काम करत असताना सर्पदंश झाल्याने त्यांचा दिनांक 3 नोव्हेंबर रोजी यवतमाळ येथे उपचार दरम्यान मृत्यू झाला असून या घटनेचा अधिक तपास राळेगाव पोलीस करीत आहे.