बार्शीटाकळी: बियाणे काॅटन चौकातील भुयारी गटार नाल्यात 27 सप्टेंबर रोजी वाहून गेलेल्या इसमाचा मृतदेह अखेर सापडला.
काॅटन चौकातील भुयारी गटार नाल्यात 27 सप्टेंबर रोजी वाहून गेलेल्या इसमाचा मृतदेह अखेर तीन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर सापडला आहे. संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या दीपक सदाफळे यांच्या नेतृत्वाखाली पिंजर येथे सकाळी 9 वाजता 120 किमी अंतरावर पुर्णा नदीपात्रात मृतदेह सापडला. जिल्हाधिकारी वर्षा मिना यांच्या आदेशानुसार आरडीसी विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आव्हानात्मक ऑपरेशन यशस्वी झाले. नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवली असून पुढील कारवाई जळगाव जामोद पोलीस करत आहे