नागपूर शहर: मोर भवन बस स्टॉप मागे शस्त्र घेऊन फिरणाऱ्या आरोपीला अटक
14 सप्टेंबरला रात्री 7 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार सीताबर्डी पोलिसांनी मोर भवन बस स्टॉप मागे शस्त्र घेऊन फिरणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. अटकेतील आरोपीचे नाव मोहम्मद अख्तर अन्सारी वल्द पीर मोहम्मद असे सांगण्यात आले असून त्याच्याकडून एक हत्ती मार चाकू किंमत दोनशे रुपये जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.