राधानगरी: प्रेमविवाहाच्या रागातून कबनूरमध्ये शिंगे दांपत्यावर प्राणघातक हल्ला, न्यायालयाने चौघांना सुनावली पोलिस कोठडी
इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर शनिवारी सकाळच्या सुमारास घडलेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे.किरकोळ कारणावरून प्रमोद बाबासो शिंगे (वय ३९, रा. सिद्धार्थ नगर, मराठी शाळेजवळ, कबनूर) व त्यांच्या पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला.या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून आज रविवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.