आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत, नवीन पनवेल मधील प्रसिद्ध 'चिंतामणी मित्र मंडळा'चे अध्यक्ष मयूर शेळके आणि उपाध्यक्ष अश्विन डिचोलकर यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. या सर्व प्रवेश कर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षात स्वागत करत चिंतामणी मित्र मंडळाच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी केलेल्या पक्षप्रवेशामुळे नवीन पनवेल परिसरात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक वाढली आहे. सामाजिक कार्याचा अनुभव असलेल्या अशा तरुणांची पक्षाला गरज आहे," असे मत व्यक्त केले.