भंडारा: शहरात मुसळधार पावसामुळे महिला समाज शाळेच्या परिसरासह अनेक घरांमध्ये शिरले पावसाचे पाणी; जनजीवन विस्कळीत
भंडारा शहरात आज 15 सप्टेंबर रोजी पहाटेपासूनच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सुमारे दोन तास कोसळलेल्या या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. शास्त्री चौक, राजगोपालाचारी वार्ड, वैशाली नगर तसेच विविध परिसरात अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी साचले. या मुसळधार पावसामुळे महिला समाज शाळेच्या आवारातही पाणी शिरले आहे. त्यामुळे शाळेला तलावाचे स्वरूप आले आहे. याव्यतिरिक्त, शहरातील अनेक घरांमध्येही पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल..