डाबकी रोड घरफोडी अवघ्या १२ तासांत उघड, पोलिसांकडून २१.७५ लाखांचा जप्त केला.अकोल्यातील डाबकी रोड परिसरात झालेली घरफोडी अवघ्या १२ तासांत उकलत पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. फिर्यादी गौरव विजयकर यांच्या घरातील सोन्या-चांदीचे एकूण १७३.३३० ग्रॅम दागिने आणि ₹५,३५० रोख असा एकूण ₹२१,७५,१७५ मुद्देमाल चोरीला गेला होता. तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून पूर्ण मुद्देमाल हस्तगत केला.