पोलीस ठाणे एक सदर येथे वाहन चालक पदावर कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार मोहम्मद आवेश वल्द अब्दुल रशीद वय 55 वर्ष हे स्टाफ सह तपासणी त्यांचे वाहन घेऊन 9 डिसेंबरला दुपारी अडीच वाजता च्या सुमारास पोलीस ठाणे जुनी कामठी हद्दीत गेले होते. दरम्यान ते वाहन घेऊन उभे असताना अचानक बेशुद्ध होऊन खाली पडले.. त्यांना उपचाराकरिता मेयो हॉस्पिटल येथे नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्राप्त वैद्यकीय सूचनेवरून पोलीस स्टेशन जुनी कामठी येथे अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली.