ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत गुटखा वाहतुकीच्या कारवर कारवाई, 05 लाख 97 हजार 580 रुपयांचा मुद्द्यामाल जप्त
बीड जिल्ह्यात शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मा. पोलीस अधीक्षक नवनित कॉवत यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एक कारसह लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शेख मोहसिन शेख सलाउद्दीन (रा. मोमीनपुरा, बीड) हा स्विफ्ट कार मधून सुगंधित पान मसाला आणि गुटखा बेकायदेशीरपणे ग्रामीण ठाणे हद्दीत घेऊन आला असता कारवाई केली.