कोपरगाव तालुक्यातील वेस - सोयेगाव येथे आज 1 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता 10 कोटी रुपये निधीतून होणाऱ्या रूपांतरित साठवण तलाव कामाचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.सदर साठवण तलावामुळे पाणी साठवण क्षमता वाढून परिसरातील शेतकरी व नागरिकांना मोठा फायदा होणार आहे तसेच भुजल पातळी वाढण्यासही मदत होणार आहे. याप्रसंगी जलसंधारण विभागाचे श्री सोनवणे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.