मलकापूर: बेलाड फाट्याजवळ कंटेनरची दुचाकीला धडक,दुचाकीस्वार ठार
मलकापूर तालुक्यातील बेलाड फाट्याजवळ नॅशनल हायवे क्रमांक ५३ वर १३ ऑक्टोबर रोजी भीषण अपघात घडला. भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.शरद दशरथ नारखेडे असे दुचाकीस्वाराचे नाव आहे.घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा करून मलकापूर शहर पोलिस स्टेशनला मृत्यूची नोंद केल्याची माहिती १४ आक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.