सातारा: स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पँथर सेनेत नव्या जबाबदाऱ्या — ऋषिकेश घाडगे यांची युवक जिल्हाध्यक्षपदी निवड
Satara, Satara | Oct 17, 2025 येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनेला बळकटी मिळावी व चांगले उमेदवार उभे राहावेत यासाठी ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने जिल्ह्यातील रिक्त पदांची निवड प्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी सांगितले.या पार्श्वभूमीवर आज दिनांक 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 1वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आयोजित कार्यक्रमात, महाबळेश्वर-पाचगणी-वाई-खंडाळा-शिरवळ ग्रामीण जिल्हा युवक अध्यक्षपदी ऋषिकेश घाडगे यांची निवड करण्यात आली.