हिंगोली: जिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिकेमुळे रुग्णाची गैरसोय #jansamasya
हिंगोली शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णवाहिका नादुरुस्त असल्यामुळे प्रसूती झालेल्या महिला पेशंटला गावाकडे जाण्यासाठी वाहन मिळत नाही ते तात्काळ उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आज दिनांक 11 ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता रुग्ण महिलांनी केली आहे. तसेच जनसेवा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष पिंटू गोरे अमोल घोंगडे इतर पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करू असे इशारा त्यांनी दिला आहे,