जळगाव: पाचोरा शहरात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; हिवरा नदीला पूर, अनेकांच्या घरात पाणीच पाणी; मंत्र्यांनी केली पाहणी
पाचोरा शहर आणि परिसरात काल रात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हिवरा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरले, ज्यामुळे अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, आमदार किशोर पाटील आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सोमवारी २२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.