भोकरदन: अनवा येथे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी जेष्ठ नागरिकांशी साधला संवाद
आज दिनांक 11 मे 2026 वार सोमवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील अनवा येथे भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी गावाला भेट देत गावातील ज्येष्ठ नागरिकांशी व गावकऱ्यांची विविध मुद्द्यांवर संवाद साधत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे, याप्रसंगी त्यांनी अर्धा ते पाऊण तास या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला आहे. यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.