जत: जत मधील अतिवृष्टी तात्काळ पंचनामे करा पडळकर यांच्या प्रांताधिकारी तहसीलदार यांना सूचना
Jat, Sangli | Sep 22, 2025 जत विधानसभा मतदारसंघात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिके व गावकऱ्यांची घरे या दोन्हींचे प्रचंड नुकसान झाले आहे. आज हळ्ळी येथे जाऊन आमदार पडळकर यांनी पिकांचे झालेले नुकसान तसेच गावातील सुमारे ६० ते ७० घरांची झालेली पडझड याची प्रत्यक्ष पाहणी केली. या कठीण प्रसंगी शेतकरी व गावकरी बांधवांच्या वेदना समजून घेतल्या. यावेळी प्रांताधिकारी, तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.