जालना: मामा चौक ते दवा मार्केट रस्ता जलमय; नाल्यांच्या सफाईकडे महापालिकेची कानाडोळा, नागरिक संतप्त..
Jalna, Jalna | Jun 26, 2026 मामा चौक ते दवा मार्केट रस्ता जलमय; नाल्यांच्या सफाईकडे महापालिकेची कानाडोळा, नागरिक संतप्त.. आज दिनांक 26 शुक्रवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील जुना मोंढा परिसरातील मामा चौक ते दवा मार्केट या अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर पावसाचे आणि नाल्याचे पाणी थेट रस्त्यावर साचल्याने नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. दवा मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील नाल्या पूर्णपणे तुंबल्यामुळे पाण्याचा निचरा होत नसून संपूर्ण रस्ता अक्षरशः तलावाचे स्वरूप धारण कर