पनवेल आणि उरण मतदारसंघाला थेट जोडणाऱ्या बहुप्रतिक्षित नवीन पुलाचे उद्या शनिवार, २२ नोव्हेंबर २०२५ रोजी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन होत असून या पुलामुळे दशकांपासूनच्या जुन्या पुलावरील वाहतूक कोंडीपासून नागरिकांना मोठी दिलासा मिळणार आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या पुढाकारातून पनवेल महापालिकेच्या माध्यमातून हा पुल साकारण्यात येत आहे.