हातकणंगले: तारदाळ-हातकणंगले रस्त्यावरील धोकादायक वळणांवर सुरक्षेसाठी मनसेकडून सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन
तारदाळ येथून दत्त मंदिरमार्गे सन्मति हायस्कूलपर्यंतच्या रस्त्यावर असलेल्या दोन तीव्र वळणांवर वारंवार अपघात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने रस्ता सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजनांची मागणी करणारे निवेदन सार्वजनिक बांधकाम उपविभाग, हातकणंगले यांना आज सोमवारी दि. 15 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता देण्यात आले. मनसेचे हातकणंगले तालुका उपप्रमुख प्रमोद परीट यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, तारदाळ-हातकणंगले रस्त्यावर अवाढव्य मालवाहतूक होत असते.