शिरूर कासार: श्री निगमानंद विद्यालयात 19 वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांचा एकत्र येत स्नेहमेळावा उत्साहात पार पडला
शिरूर कासार तालुक्यातील निमगाव मायंबा येथील श्री निगमानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात तब्बल एकोणवीस वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. सन 2006-2007 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी हा अविस्मरणीय स्नेह मिलन सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ह. भ. प. गुरुवर्य महंत स्वामी जनार्दन महाराज यांची उपस्थिती लाभली. तसेच विद्यालयाचे तात्कालीन मुख्याध्यापक श्री काळे सर, तसेच घरघिणे सर, स्वामी सर, केळगंद्रे सर