केज: कोरडेवाडीत साठवण तलाव तयार करण्यासाठी नागरिकांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले
Kaij, Beed | Oct 14, 2025 कोरडेवाडी येथील साठवण तलावाचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा या मागणीसाठी चार ते पाच गावकऱ्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान आंदोलनकर्त्यांची प्रशासन दखल घेत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पाच बसेसवर दगडफेक केली. यामध्ये एक बसचालक जखमी झाला आहे.