महाराष्ट्रातील 288 नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपाने आदतपूर्व यश संपादन केले आहे एकूण निकालापैकी 80% जागावर महायुतीने वर्चस्व प्रस्थापित केले तर एकट्या भाजपाने 50% जागा जिंकत जनतेचा प्रचंड विश्वास मिळवला आहे हा विजय म्हणजे विकास सुशासन आणि संघटन शक्तीवर जनतेने टाकलेला ठाम विश्वास असल्याचे मत राजकीय जाणकारांचा आहे या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर प्रोफेसर चौक येथे भाजपाच्या वतीने जल्लोष करण्यात आला ढोल ताशांच्या गजरात फटाकांच्या आतिषबाजीसह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला