प्रधानमंत्री आवास योजनेच्या सर्वेक्षणाला मुदतवाढ, पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचं गगनबावडा पंचायत समितीचे आवाहन
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण विभागासाठी शासनाने 18 जून पर्यंत मुदतवाढ दिली आहे. पात्र ग्रामीण कुटुंबासाठी होणाऱ्या सर्वेक्षणासाठी ही अंतिम मुदत वाढ देण्यात आली आहे. त्यानंतर मुदत वाढ देण्यात येणार नाही त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आज मंगळवार 10 जून सायं साडेचार च्या दरम्यान गगनबावडा पंचायत समितीने केले.