माजलगाव: वडवणीच्या देवगावात शेतकऱ्यांनी उभारले जिल्ह्यातील पहिले ऊस संशोधन अभ्यास केंद्र
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील देवगाव येथील प्रगतशील शेतकरी माऊली सुरवसे यांनी आपल्या शेतात अत्यंत वेगळ्या पद्धतीने ऊस संशोधन व प्रयोग अभ्यास केंद्र उभारले आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि ऊस शेतीतील नव्या पद्धती विकसित करण्याच्या उद्देशाने त्यांनी हे संशोधन केंद्र सुरू केले आहे. या केंद्रामध्ये ऊसाच्या विविध उच्च उत्पादनक्षम आणि रोगप्रतिरोधक जातींवर संशोधन करण्यात येते. नवे प्रयोग करून उत्तम दर्जाचे बेणे तयार केले जाते.