जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर खालापूर पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात कंबर कसली असून, पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी कारवाई केली आहे. सावरोली टोलनाक्याजवळ पोलिसांनी एका कंटेनरमधून तब्बल ६३ लाख ३४ हजार २०० रुपये किमतीचा सुगंधित पान मसाला आणि तंबाखूयुक्त गुटखा जप्त केला आहे. या कारवाईत ४० लाख रुपये किमतीचा कंटेनरसह एकूण १ कोटी ३ लाख ३४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.