कामठी: कामठी येथील गोयल टॉकीज चे संचालक यांचा मृत्यू, पालकमंत्री यांनी व्यक्त केली शोक संवेदना
Kamptee, Nagpur | Sep 15, 2025 कामठी येथील गोयल टॉकीजचे संचालक भवानी शंकर गोयल यांचे आज वयाच्या 86व्या वर्षी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या गोयल टॉकीज येथूनच निघणार असल्याचे कळविण्यात आले आहे. दरम्यान पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शोक संवेदना व्यक्त केली आहे.