वडवणी: डॉक्टर मुंडे या मृत डॉक्टरचे बोट वापरून तिचा मोबाईल डाटा डिलीट केल्याचा कुटुंबीयांनी आरोप केला
Wadwani, Beed | Oct 29, 2025 फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी कुटुंबीयांनी आता नवा आणि गंभीर दावा केला आहे. डॉक्टरांनी गळफास घेतल्याची माहिती मिळताच कुटुंबीय घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला होता.दरम्यान, मृतदेहाच्या हातावर सुसाईड नोट आढळली असतानाच, कुटुंबीयांनी असा संशय व्यक्त केला आहे की, मृत डॉक्टरचे फिंगर लॉक मोबाईल उघडण्यासाठी वापरण्यात आले आणि त्यातील महत्त्वाचा डाटा, तसेच घटनेसंबंधित पुरावे डिलीट करण्यात आले