ठाणे: ठाणे महापालिकेतील काही भागात २४ तास पाणी पुरवठा बंद, ठाणे महापालिकेने दिली माहिती
Thane, Thane | Sep 16, 2025 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रातील जलाशय येथे बारवी गुरुत्व वाहिनी क्र. १. २ व ३ वर वाहिन्यांचे उन्नतीकरण व तातडीने देखभाल करण्यासाठी शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे, ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा, मुंब्रा, दिवा यांच्यासह वागळे आणि माजिवडा-मानपाडा प्रभाग समितींचा काही भागात १९ सप्टेंबर रोजी पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.