मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञानवारी आणि मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना राबविण्याबाबत चर्चा सुरू असताना एक मुद्दा प्रकर्षाने पुढे आला. भाजपच्या सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना मंत्रिमहोदयांनी थेट नियोजन विभागाकडे बोट दाखवले.या सरकारमधील योजनांचा फुटबॉल कसा होतो.याचे उदाहरण सभागृहात पाहायला मिळाले.विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या व संधी उपलब्ध करून देणाऱ्या योजना सरकार आणत असेल तर आम्ही मनापासून समर्थन करतो परंतु तीन पक्षाचे हे महायुती सरकार एकमेकातच संघर्ष करत आहे.