जालना: डिजिटल भारताच्या विकासाला भ्रष्टाचाराचा व्हायरस?; मौजपुरी जिल्हा परिषद शाळा चार-पाच वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत
Jalna, Jalna | Jul 3, 2026 देशाला डिजिटल भारत बनविण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्र सरकार विविध योजनांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करत असताना, स्थानिक पातळीवरील भ्रष्टाचार, टक्केवारीची संस्कृती आणि प्रशासकीय उदासीनता यामुळे ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा मात्र आजही विकासाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शुक्रवार दि.3 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील मौजपुरी येथील जिल्हा परिषद शाळेची अवस्था ही त्याचेच जिवंत उदाहरण असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला.