गंगापूर: कसाबखेडा फाटा येथील तो रस्ता तत्काळ दुरुस्त करा, अन्यथा रस्ता रोको करू रिपब्लिकन टायगर सेनेचा इशारा
गंगापूर तालुक्यातील वाहतुकीचा जीवनदायी रस्ता म्हणून ओळख असलेला धुळे सोलापूर राष्ट्रीय मार्ग क्रमांक 52 हा कन्नड वैजापूर गंगापूर या तालुक्यांसाठी छत्रपती संभाजीनगरला मिळणारा मुख्य रस्ता आहे त्यातच कसाबखेडा फाटा परिसरात याची दयनीय अवस्था झाली आहे.