भंडारा नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, ईव्हीएममधील कथित फेरफार आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी भंडारा शहरात पुन्हा एकदा आंदोलनाचे रणशिंग फुंकले गेले आहे. २९ डिसेंबर रोजी याच मागण्यांसाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आणि हजारो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते, मात्र या निवेदनावर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने जनतेमध्ये तीव्र संताप व्यक