केज: कोल्हेवाडी येथील वृद्धाच्या खिशातील जबरदस्तीने दोन लाख रुपये काढून घेतले, दोघांच्या विरोधात केज ठाण्यात गुन्हा दाखल
केज तालुक्यातील कोल्हेवाडी येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ओळखीचा गैरफायदा घेऊन आणि शिवीगाळ करून 75 वर्षीय वृद्ध व्यक्तीच्या खिशातील तब्बल दोन लाख रुपये काढून घेतल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे. ही घटना कोल्हेवाडी (ता. केज) येथे घडली. तुकाराम सोपान चौरे (रा. तुकुचीवाडी ह. मु. कोरेगाव) आणि नवनाथ तांदळे (रा. कोरेगाव) या दोन आरोपींनी वैजनाथ धोंडिबा आंधळे (रा. कोल्हेवाडी) या 75 वर्षीय वृद्धाला शिविगाळ करत दोन लाख रुपये काढून घेतले.