जालना: पत्नीला मुलबळ नसल्याने खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; जालना जिल्हा सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
Jalna, Jalna | Jun 3, 2026 जालना येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाने खून प्रकरणातील आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. मा. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. मोहिते-मंडळ यांनी आरोपी किशोर हिम्मतराव आटोळे (वय ४५, रा. शंकर नगर, जुने जालना) यास भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत दोषी ठरवत जन्मठेप व १० हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. प्रकरणातील माहितीनुसार, दिनांक ३० डिसेंबर २०२२ रोजी सकाळी सुमारे ८ वाजता पूर्वीच्या भांडणाच