वाढवण बंदराला नागरिकांचा तीव्र विरोध! आंदोलनादरम्यान पोलिसांकडून मारहाणीचा आरोप
पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाविरोधात नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. आंदोलनादरम्यान विरोध करणाऱ्या नागरिकांना पालघर पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेनंतर "पोलिस कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आहेत की बिघडवण्यासाठी?" असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, "पोलिसांना नागरिकांवर मारहाण करण्याची परवानगी कोणी दिली?" असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
आंदोलकांनी वाढवण बंदर प्रकल्प रद्द करण्याची मागणी पुन्हा एकदा जोरदारपणे मांडली आहे. या प्रकरणी पोलिस आणि प्रशासनाची अधिकृत भूमिका समोर येणे अद्याप बाकी आहे.
📲 अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Times Of Maharashtra News Follow करा.
👍 Like • Comment • Share करायला विसरू नका!
#VadhvanPort #Palghar #PalgharPolice #Protest #MaharashtraNews BreakingNews MarathiNews TimesOfMaharashtraNews
Pune City, Pune | Jul 26, 2026