नागपूर ग्रामीण: भांडेवाडीतील 'झिग्मा' कंपनीत कामगारांचा एल्गार; प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात कामबंद आंदोलन
नागपूर महानगरपालिका अंतर्गत भांडेवाडी येथील झिग्मा एन्वायरों सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कामगारांचे शोषण आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात शेकडो कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते नितिन तिवारी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे. कामगारांना किमान वेतन आणि रजा पगार दिला जात नाही. तसेच त्यांच्याकडून नियबाह्य १२ तास काम करून घेतले जात आहे.